आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग १ – मराठी
₹180.00आधुनिक इतिहासाचे मानबिंदू
ऐकल्याशिवाय बोलता येत नाही. यश जाणल्याशिवाय यशस्वी होता येत नाही.
प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जवळून बघण्यासाठी व जाणण्यासाठी… येत आहे – दैनिक ’प्रत्यक्ष’
दैनिक प्रत्यक्षचा पहिला अंक प्रकाशीत होण्याअगोदर या बिगर राजकीय वर्तमानपत्राविषयी त्या वेळेच्या आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रत्यक्षविषयी एक जाहिरात छापून आली होती. त्यातील वरिल वाक्यांनी वाचकांच्या मनात कुतुहल निर्माण केले होते.
कला असो की क्रीडा, साहित्य असो की व्यवसाय अशा नानाविध क्षेत्रात प्रदीर्घ काळाचा इतिहास अनुभवलेल्या व्यक्ती आपल्यात वावरत असतात. या व्यक्तींच्या इतिहासातील आठवणी, त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला मिळावा म्हणून ’चालता बोलता इतिहास’ या सदराचे प्रयोजन केले होते. ’आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ हे पुस्तक म्हणजे ’दैनिक प्रत्यक्ष’ मधील ’चालता बोलता इतिहास’ या सदरातील लेखमालांचे सुंदर कोलाज्. हे पुस्तक दोन भागात प्रकाशीत झाले. व त्यात पुढील मान्यवरांवर लिहिलेल्या लेखमालेतील लेख होते.
’आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ – भाग १
संगीतकार प्यारेलाल – वर्षानुवर्षे अप्रतिम संगीताचा नजराणा देणार्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडगोळीपैकी प्यारेलाल
जयमाला शिलेदार – संगीत रंगभूमीचा इतिहास अनुभवलेल्या, संगीत रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या जयमालाबाई म्हणजेच नाट्यसंगीताची साचार तपस्विनी
सलीम खान – सलीम-जावेद हे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कथा-पटकथा-संवाद लेखक म्हणून आघाडीचे नाव. यातील सलीम खान म्हणजे इतिहासाची जाण आणि वर्तमानकाळाचं भान राखणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व.
अमीन सयानी – नादमधुर शब्दफेक व लयकारी भाषेचा गोडवा लाभलेले आकाशवाणी (रेडियो) क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे अमीन सयानी. ’बिनाका गीतमाला’ (Link) या अजरामर कार्यक्रमामुळे हे नाव भारतातील घराघरात पोहोचले आहे.
आशालता वाबगांवकर – मराठी रंगभूमी आणि हिंदी-मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीतील अनेकविध भूमिका आपल्या अभिनयने जीवंत करणार्या जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगांवकर.
पंढरीनाथ जुकर – हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीमधील मेकअप मन’. दिलीपकुमार ते शाहरुख खान व मीनाकुमारी (Link) ते माधुरी दिक्षीत अशा अनेक सिनेनटनट्यांचे मेकअप मन