₹180.00
आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग २ – मराठी
`आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ – भाग २
मुरलीधर शिंगोटे – वृत्तपत्र विक्रेतापासून वितरक आणि वितरकांपासून वृत्तपत्रांच्या समूहाची मालकी हा जीवनप्रवास
बाळासाहेब विखे-पाटील – सहकारक्षेत्रातील प्रभावी आणि आदरणीय अधिकारी व्यक्तिमत्व
अनिल फडके – मनोरमा प्रकाशनाचे मालक. वाचकांची नस ओळखणार्या फडके यांचा प्रकाशन व्यवसायातला अनुभव खर्या अर्थाने बोलका, आपल्याला अंतर्मुख करणारा आणि त्याचवेळी आपली उमेद वाढविणारा आहे.
प्रभाकर देवधर – देशातील उद्योगक्षेत्राला फार मोठे योगदान देणार्या देवधर यांनी १९८२ ते ९१ या काळात राजीव गांधी यांचे ’इलेक्ट्रॉनिक्स’ क्षेत्राचे सल्लागार म्हणून काम पाहिले. महत्वाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे प्रमुख (अॅपलॅब ग्रुप ऑफ कंपनीज्) म्हणून देवधर यांनी प्रचंड कर्तृत्त्व गाजविले.
मृणाल गोरे – पाणीवाली बाई म्हणून जनसामांन्यांमध्ये परिचीत. लोकांच्या प्रश्नांसाठी समाजकारणात, राजकारणात उतरलेल्या समाजवादी ध्येयवादाचे संस्कार असलेल्या पिढीच्या त्या प्रतिनिधी आहेत.
अशा या व्यक्तिमत्त्वांची एकत्र भेट घेण्याची संधी वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून मिळत आहे. मात्र ही पुस्तके वाचकांसमोर आणताना एक गोष्ट आवर्जुन सांगायला हवी. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या या लेखमाला विशेष बदल न करता, त्याच स्वरुपात वाचकांसमोर मांडण्यात आल्या आहेत. यातले स्थळकाळाचे संदर्भही तसेच ठेवण्यात आले आहेत. सुजाण वाचक याची नक्कीच नोंद घेतील.