आपत्कालीन व्यवस्थापन – मराठी
₹250.00अनेक आपत्तींची टांगती तलवार सातत्याने मानवाच्या डोक्यावर आहे. नैसर्गिक आपत्ती उदा. भूकंप , वादळे, पूर , भूस्खलन , दुष्काळ इ. चे आघात होतच असतात. मानवनिर्मीत आपत्ती उदा. मोठे अपघात , रासायनिक, जैविक व आण्विक युद्धे यातही जग होरपळून निघतच आहे. या सर्व आपत्तींमुळे जीवितहानी, आर्थिक व सामाजिक नुकसान होते, तसेच पर्यावरणावरही त्यांचा विपरीत परिणाम होतो.
या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही आज राष्ट्रांची प्राथमिक गरज झाली आहे. ह्याची गरज जशी सरकारला आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक देशातील नागरिकांना. कारण, कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिकच होरपळून निघतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थ्यापनात नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे.
ऑगस्ट २००१ मध्ये डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम. डी. (मेडिसिन) ह्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून ’डिसास्टर मॅनेजमेंट अॅकॅडमी’ची संकल्पना मांडली व त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली ’अनिरुद्धाज् अॅकॅडमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट’ ची स्थापना झाली. ही अॅकॅडमी स्थापन होताच प्रथम प्राधान्य दिले गेले, ते संपूर्ण, सर्वसामावेशक अशा स्वरूपातील ’डिसास्टर मॅनेजमेंट’ अर्थात ’आपत्तीनिवारण’ ह्या विषयावरील पुस्तक तयार करण्याला. ह्या पुस्तकाच्या आधारे आजमितीस (म्हणजेच जुलै २०२१ पर्यंत) आपल्या देशातील जवळपास ८४,००० हजारापेक्षाही अधिक नागरिकांना ह्या विषयाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्येही हा विषय आता समाविष्ट केला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.
आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती कुठल्याही जाती, धर्माची असो, तीला नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनात सज्ज करणे हे अनिरुद्धाज् अॅकाडेमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट चे ध्येय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय मदत येईपर्यंत बचाव पद्धती , प्राथमिक प्रथमोपचार, कार्डिओ पल्मनरी सेरेब्रल रीसिसिटेशन (सीपीसीआर) मध्ये तयार करणे आणि सुसज्ज करणे हे महत्वाचे कार्य आहे. यामुळे आपत्तीच्या कारणाने होणारे नुकसान कमी होते तसेच जखमी व्यक्तिंचा जीव वाचविण्यामध्येही मदत होते. हे पुस्तक यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
ह्या पुस्तकाची शैली अत्यंत सहज व सोपी असून ह्यात आपत्तीचे प्रकार, आपत्तींना देण्यात येणारा प्रतिसाद, प्रतिबंधक उपाय अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे. तसेच या पुस्तकात काळाला अनुरुप बदलही करण्यात आले आहेत. ह्या पुस्तकातील मार्गदर्शन, माहिती व सूचना यांचे योग्य प्रकारे पालन केल्याने योग्य प्रकारे आपत्तीच्या घडीला समर्थपणे सामोरे जाता येईल, ही मात्र निश्चित गोष्ट आहे.